Vaibhav Suryavanshi ला सचिनप्रमाणे जपा; त्याचा विनोद कांबळी, पृथ्वी शॉ होता कामा नये! BCCI ला बड्या व्यक्तीचा गंभीर इशारा

Protect Vaibhav Suryavanshi like Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेटचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी याचं कौशल्य आणि मानसिकतेचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी बीसीसीआयला एक गंभीर इशारा दिला आहे.
VAIBHAV SURYAVANSHI
VAIBHAV SURYAVANSHI esakal
Updated on

Greg Chappell warns BCCI about young Indian cricketers: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि १७ वर्षीय आयुष म्हात्रे यांनी हवा केली आहे. या दोघांकडे भविष्याचा स्टार म्हणून पाहिले जात आहे. पण, एवढ्या कमी वयात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे यांच्या डोक्यात हवा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वैभवने हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावणारा आशियाई फलंदाजाचा मान पटकावला आहे आणि त्याच्या आक्रमक खेळीचं भरभरून कौतुक होत आहे. मात्र, त्याची काळजी न घेतल्यास त्याचा विनोद कांबळी, पृथ्वी शॉ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशात जसं सचिन तेंडुलकरला त्याच्या लहानवयात जपलं गेलं, तशीच जपवणूक वैभवची करावी असा सल्ला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com