esakal | IPL : कोणता विचार करुन धोनी मैदानावर उतरला? माहीनं सांगितलं विजयाचं 'सिक्रेट' कारण I MahendraSingh Dhoni
sakal

बोलून बातमी शोधा

Mahendra Singh Dhoni
चेन्नई सुपर किंग्जनं (CSK) आयपीएलच्या 14 व्या हंगामात अंतिम फेरीत धमाकेदार कामगिरी केलीय.

IPL : कोणता विचार करुन धोनी मैदानावर उतरला?

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Indian Premier League 2021 : चेन्नई सुपर किंग्जनं (CSK) आयपीएलच्या 14 व्या हंगामात अंतिम फेरीत धमाकेदार कामगिरी केलीय. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं (Mahendra Singh Dhoni) अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर सांगितलं, की दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) गोलंदाजी आक्रमणचा विचार करता, पहिला क्वालिफायर सामना कठीण होईल, हे मला आधीच माहीत होतं, अशी त्यांनी सामना संपल्यानंतर कबुली दिलीय. आता अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे.

कालच्या सामन्यात धोनीनं पुन्हा फिनिशरची भूमिका बजावली आणि शेवटी 6 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. दोन चेंडू शिल्लक असताना त्यानं विजय सुनिश्चित केला. त्याच्या आधी ऋतुराज गायकवाड (70) आणि रॉबिन उथप्पा (63) यांनी अर्धशतके झळकवत दुसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

हेही वाचा: राजधानीला ओव्हरटेक करत चेन्नई एक्स्प्रेसनं गाठलं फायनल जंक्शन

धोनी सामन्यानंतर म्हणाला, 'या सामन्यात माझा डाव खूप महत्त्वाचा होता. दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी आक्रमण चांगले होते. त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतला, त्यामुळे आम्हाला माहित होतं, की हा सामना आमच्यासाठी सोपा होणार नाही, अशी त्याने कबुली दिली. सलामीवीर पृथ्वी शॉ (60 धावा) आणि कर्णधार ऋषभ पंत (नाबाद 51) यांच्या अर्धशतकांमुळे दिल्ली कॅपिटल्स संघानं धोनीच्या संघाला 172 धावांचं आवाहन दिलं. आपल्या खेळीबद्दल धोनी म्हणाला, 'मी स्पर्धेत फार चांगली खेळी खेळली नाही, पण या सामन्यात मला चेंडू बघून खेळायचा होता. मी नेटमध्ये चांगली फलंदाजी करत होतो. पण, जास्त विचार करत नव्हतो, कारण जर तुम्ही फलंदाजी करताना जास्त विचार केलात, तर तुमची रणनीती खराब होऊ शकते, असं त्याचं म्हणणं होतं.

हेही वाचा: Video : पंतचा एकहाती फटका, धोनी-ठाकूर बघतच राहिले

शार्दुल ठाकूरबाबत धोनी म्हणाला, 'शार्दुल ठाकूरनं अलीकडच्या काळात चांगली फलंदाजी केलीय, त्यामुळे त्याला आधी पाठवण्यात आलं.' उथप्पाबद्दल तो म्हणाला, 'रॉबिन नेहमी वरच्या फलंदाजीचा आनंद घेतो. मोईन अलीनं तिसऱ्या क्रमांकावर चमकदार कामगिरी केलीय. तो कोणत्याही स्थितीत सामना फिरवू शकतो, त्यामुळे ही जोडी संघासाठी खूप महत्वपूर्ण आहे. धोनी ऋतुराजबद्दल म्हणाला, 'मी आणि ऋतुराज जेव्हा बोलत असतो, तेव्हा आम्ही उद्याच्या सामन्यांचा जास्त विचार करतो. त्याच्या मनात काय चाललंय, हे मला नेहमी जाणून घ्यायचं असतं. तो खेळात खूप सुधारणा करतोय, त्याचा हा खेळ पाहून मला आनंद होतोय, असं त्यानं सांगितलं. गेल्या हंगामात आम्ही पहिल्यांदाच प्लेऑफसाठी अपात्र ठरलो, पण या हंगामात आम्ही शानदार पुनरागमन केलंय, असंही धोनी म्हणाला.

loading image
go to top