IPLमध्ये नव्या वादाला सुरुवात! चेन्नईच्या मॅचनंतर अश्विनने अंपायरवर केला गंभीर आरोप

IPLमध्ये नव्या वादाला सुरुवात! चेन्नईच्या मॅचनंतर अश्विनने अंपायरवर केला गंभीर आरोप

IPL 2023 Ashwin Statement Controversy : आयपीएल 2023 मध्ये काल राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. राजस्थानच्या संघाने हा रोमांचक सामना तीन धावांनी जिंकला, मात्र या सामन्यानंतर संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण होताना दिसत आहे.

IPLमध्ये नव्या वादाला सुरुवात! चेन्नईच्या मॅचनंतर अश्विनने अंपायरवर केला गंभीर आरोप
IPL 2023: शेवटच्या चेंडूवर धोनीच्या CSKचा पराभव करणाऱ्यासाठी संजूला मोजावे लागले लाखो रुपये

राजस्थान रॉयल्सचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या आयपीएल सामन्यात दव पडल्यामुळे पंचांनी स्वत:हून चेंडू बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. रविचंद्रन अश्विनने म्हणाला की, खूप दव असताना पंचांनी चेंडू बदलताना असे यापूर्वी मी तरी कधीही पाहिले नाही.

बुधवारी रात्री चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान भरपूर दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात पंचांनीच चेंडू बदलल्याने अश्विनला आश्चर्याचा धक्का बसला. या ऑफस्पिनरने सामन्यात 25 धावांत दोन बळी घेतले. राजस्थानने हा सामना तीन धावांनी जिंकला.

IPLमध्ये नव्या वादाला सुरुवात! चेन्नईच्या मॅचनंतर अश्विनने अंपायरवर केला गंभीर आरोप
CSK IPL 2023 : पराभवानंतर CSKला आणखी एक मोठा धक्का, स्टार खेळाडू दोन आठवडे बाहेर

सामना संपल्यानंतर रविचंद्रन अश्विन म्हणाला की, दव पडल्यामुळे पंचांनी स्वत:हून चेंडू बदलला हे आश्चर्यकारक होते. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते आणि मला आश्चर्य वाटले. खरे सांगायचे तर, आयपीएलमध्ये यावेळी मैदानावर घेतलेल्या काही निर्णयांमुळे मला थोडे आश्चर्य वाटते.

पुढे अश्विन म्हणाला, 'आमचा संघ गोलंदाजी करत होता आणि आम्ही चेंडू बदलण्यास सांगितले नाही, परंतु पंचांनी स्वतःहून चेंडू बदलला. मी अंपायरला विचारले आणि त्यांनी सांगितले की आम्ही ते करू शकतो. त्यामुळे मला आशा आहे की जेव्हाही दव असेल तेव्हा ते बदलू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com