KKR vs GT : गुरबाज गरजला, रसेल परतला तरी गुजरातने कोलकात्याला ठेवलं नियंत्रणात

KKR vs GT
KKR vs GTesakal

KKR vs GT : गुजरात टायटन्सने अखेर केकेआरचा वारू रोखण्यात यश मिळवले. इडन गार्डनवर नाणेफेक जिंकून त्यांनी कोलकात्याला 179 धावातच रोखले. केकेआरकडून सलामीवीर रहमनुल्ला गरबाजने 39 चेंडूत 81 धावांची तडाखेबाज खेळी केली. तर आऊट ऑफ फॉर्म असलेला आंद्रे रसेल देखील आजच्या सामन्यात फॉर्ममध्ये आला. त्याने 19 चेंडूत 34 धावांची खेळी केली. मात्र मोहम्मद शमी (3), नूर अहमद (2) आणि जोशुआ लिटिल (2) यांनी केकेआरच्या इतर फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे केकेआरला 200 पारचे टार्गेट ठेवता आले नाही.

KKR vs GT
Hardik Pandya Sunil Gavaskar : हार्दिक कॅप्टन्सीचा वारसा ठेवून... गावसकरांनी पांड्याला तर धोनीच्याच पंक्तीत बसवले

ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. मात्र नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरातने पॉवर प्लेमध्येच केकेआरला पहिला धक्का दिला. मोहम्मद शमीने सलामीवीर जगदीशनला 19 धावांवर बाद केले.

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर रेहमनुल्ला गुरबाजने आक्रमक अर्धशतक ठोकले. मात्र केकेआरची वरची फळी ढेपाळली. शार्दुल ठाकूर भोपळाही न फोडता माघारी फिरला. तर व्यंकटेश अय्यर 11 आणि नितीश राणा 4 धावांवर बाद झाला.

KKR vs GT
IPL 2023: फोटो काढण्याच्या नादात रस्त्यात पडली मुलगी अन्... Mumbai Indians चा खेळाडू झाला ट्रोल

एका बाजूने केकेआरचे फलंदाज स्वस्तात माघारी जात असताना गुरबाजने मात्र नेटाने फलंदाजी करत रिंकू सिंह सोबत 47 धावांची भागीदारी रचत संघाला 135 धावांपर्यंत पोहचवले. मात्र गुरबाजची ही 39 चेंडूत केलेली 81 धावांची खेळी नूर अहमदने संपवली. त्यानंतर रिंकू सिंहची देखली 19 धावांवर शिकार करत केकेआरला डबल धक्का दिला.

केकेआरचा स्टार हिटर यंदाच्या हंगामात फारशी चमक दाखवू शकला नव्हता. मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात रसेलने आक्रमक अवतार धारण केला. त्याने 19 चेंडूत 34 धावा करत केकेआरला 20 षटकात 7 बाद 179 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com