

Rajasthan Royals
sakal
मुंबई : राजस्थान रॉयल्स संघाच्या व्यवस्थापकाकडून आयपीएल नियमावलीचा भंग करण्यात आल्याची घटना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या लढतीत घडली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडूनही याबाबत दुजोरा देण्यात आला आहे; मात्र या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.