Rajat Patidar: रजत पाटीदारचा धमाका! ख्रिस गेलचा ९ वर्षांचा महाविक्रम धुळीला

Rajat Patidar Breaks Chris Gayle’s Massive IPL Record: IPL 2026 मध्ये रजत पाटीदारने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडत सर्वात जलद 100 षटकार पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऐतिहासिक कामगिरी केली.
Rajat Patidar

Rajat Patidar

esakal

Updated on

Rajat Patidar Breaks Chris Gayle’s Massive IPL Record: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या ६७ व्या सामन्यात गटविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद(SRH) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने धडाकेबाज फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २५५ धावा केल्या. ज्यामध्ये अभिषेक शर्मा याने ५६, हेन्रिक क्लासेन याने ५१ आणि इशान किशन याने ७९ धावा केल्या. धावांचा पाठलाग करायला आलेला बंगळुरू संघ २०० धावांपर्यंतच पोहोचला. ज्यामध्ये रजत पाटीदार याने ५६, व्यंकटेश अय्यर याने ४४ आणि कृणाल पांड्या याने नाबाद ४१ धावा केल्या. या सामन्यात रजत पाटीदार याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com