
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने यंदा आयपीएलच्या जेतेपदावर मोहर उमटवली. मात्र बंगळुरूच्या आनंदाला बुधवारी (४ जून) गालबोट लागलं. बुधवारी आरसीबी संघ बंगळुरूत आला होता, पण त्यावेळी चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचा बळी गेला. त्याबद्दल आता आरसीबी संघाने अधिकृत भाष्य केले असून मदतही देण्याचे आश्वासन दिले आहे.