
रजत पाटिदारच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले. आयपीएल २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला पराभूत करत अहमदाबादमध्ये विजेतेपद पटकावले.
बंगळुरू संघाने हे विजेतेपद विराट कोहलीसाठी जिंकले असल्याचे सामन्यानंतर पाटिदारने सांगितले. विराट गेली १८ वर्षे या संघाकडून खेळत आहे. विराटने सांगितले की त्याने सर्वकाही या संघासाठी दिले आहे.