
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची सुरुवात दमदार झाली आहे. रजत पाटीदार या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळताना त्यांनी पहिल्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला.
त्यामुळे बंगळुरू संघ सध्या चांगल्या लयीत दिसत आहे. या विजयानंतर बंगळुरूचे खेळाडू मिळालेल्या वेळेत थोडी मजामस्तीही करताना दिसत आहेत.