esakal | IPL 2021: "विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन करावं !
sakal

बोलून बातमी शोधा

"विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन करावं

"विराट, मॅक्सवेल अन्..."; RCBने 'या' खेळाडूंना रिटेन करावं

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 RCB vs KKR: विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला बाद फेरीत कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले. स्पर्धा संपल्यानंतर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहली आधीच सांगितलं होतं. त्यामुळे काल RCBचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराटने कर्णधारपद सोडलं. मी जर RCB संघाचा मालक असतो तर मी विराटला कधीही कर्णधारपद सोडून दिलं नसतं, असं वक्तव्य विंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने केलं. त्यानंतर आता RCBच्या भविष्याबद्दल माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही विधान केलं.

हेही वाचा: 'माझ्या पत्नीला त्रास देऊ नका'; RCB च्या क्रिकेटपटूची विनंती

"RCBच्या संघाने विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन खेळाडूंना नक्कीच संघात रिटेन केलं पाहिजे. त्यासोबत तिसरा खेळाडू म्हणून त्यांनी हर्षल पटेल किंवा युजवेंद्र चहल या दोघांपैकी एकाला संघात कायम ठेवावं. या दोघांपैकी कोणाला रिटेन करायचं ते त्यांच्या संघ व्यवस्थापनाचा निर्णय असेल. विराट त्यांचा पहिला खेळाडू आहे. त्यासोबतच ग्लेन मॅक्सवेलने त्यांच्याकडून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे मॅक्सवेल रिटेन केलं पाहिजे. एबी डिव्हिलियर्सला त्यांनी करारमुक्त करावं. कारण डिव्हिलियर्स निवृत्त झाला आहे पण मॅक्सवेलला अद्यापही भविष्यात खूप क्रिकेट खेळायचं आहे", असं गंभीरने स्पष्ट केलं.

हेही वाचा: RCB चा मालक असतो तर कोहलीला कॅप्टन्सी सोडू दिली नसती : लारा

हेही वाचा: KKRशी हारल्यानंतर RCBच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? (Video)

डिव्हिलियर्सबद्दल लारा काय म्हणाला?

"पुढच्या वर्षीच्या IPL हंगामाआधी महालिलाव होणार आहे. या लिलावात प्रत्येक संघाला आपल्याकडचे तीन खेळाडू संघात कायम ठेवता येतील असा विचार सुरू आहे. मी जर बंगळुरू संघाचा मालक असेन तर मी माझ्या संघात मॅक्सवेलला नक्कीच रिटेन करेन. मॅक्सवेल संघात आला आणि त्याने प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे खेळ करत चांगली कामगिरी केली. विराट कोहलीदेखील बडा खेळाडू आहे. त्यामुळे मी त्यालाही माझ्या संघात कायम ठेवेन. काही असे खेळाडू आहेत ज्यांना मी लिलावाआधी मुक्त करून पुन्हा संघात घेऊ शकेन. त्यामुळे या गोष्टीचा विचार करता मी तिसरा खेळाडू म्हणून देवदत्त पडीकलला संघात कायम राखेन", असं लाराने स्पष्ट केलं.

loading image
go to top