

RCB vs SRH
esakal
हैदराबाद : गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर(RCB) आणि माजी विजेता सनरायझर्स हैदराबाद(SRH) यांच्यामध्ये आज (ता. २१) आयपीएलमधील साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. ही लढत दोन्ही संघांची अखेरची लढत असणार आहे. एकीकडे बंगळूरचा संघ विजय मिळवून पहिल्या स्थानावर कायम राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल, तर दुसरीकडे हैदराबादचा संघ ‘क्वालिफायर वन’ लढतीत खेळण्यासाठी जीवाचे रान करताना दिसेल. पहिल्या दोन क्रमांकावर असलेले संघ ‘क्वालिफायर वन’ लढतीत एकमेकांविरुद्ध लढतात. एकूणच काय तर पहिल्या दोन स्थानांवर राहण्यासाठी बंगळूर-हैदराबाद यांच्यामध्ये चुरस रंगेल.