RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : ड्युप्लेसीच्या सेनेवर पॅट कमिन्स पडणार भारी? जाणून घ्या कशी असेल संघाची प्लेइंग ११

RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सहा सामन्यांमधून फक्त एका लढतीत विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसमोर आज सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान असणार आहे.
RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : ड्युप्लेसीच्या सेनेवर पॅट कमिन्स पडणार भारी? जाणून घ्या कशी असेल संघाची प्लेइंग ११

RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सहा सामन्यांमधून फक्त एका लढतीत विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसमोर आज सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान असणार आहे. हैदराबाद संघाने सलग दोन लढतींत विजय मिळवला असून आता त्यांचा संघ विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी सज्ज झाला असेल.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या हैदराबादच्या संघाने पाच सामन्यांमधून तीनमध्ये विजय मिळवले आहेत. फाफ ड्युप्लेसीच्या बंगळूर संघाला मागील चार सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर बंगळूरचा संघ आजच्या लढतीत हैदराबादला रोखणार का, असा प्रश्‍न या वेळी निर्माण झाला आहे.

RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : ड्युप्लेसीच्या सेनेवर पॅट कमिन्स पडणार भारी? जाणून घ्या कशी असेल संघाची प्लेइंग ११
Rohit Sharma : शतक ठोकल्यानंतरही रोहित शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम! IPL मध्ये ठरला तिसरा खेळाडू

विराट कोहलीने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३१९ धावा फटकावल्या आहेत. मात्र, विराट वगळता बंगळूर संघातील इतर फलंदाजांना धमक दाखवता आलेली नाही. फाफ ड्युप्लेसी (१७० धावा), दिनेश कार्तिक (१४३ धावा), रजत पाटीदार (१०० धावा), कॅमेरुन ग्रीन (६८ धावा), महिपाल लोमरोर (५० धावा) व ग्लेन मॅक्सवेल (३२ धावा) यांना बंगळूरसाठी धावा उभारता आलेल्या नाहीत. बंगळूरसाठी ही डोकेदुखी ठरली आहे.

फलंदाजीत सुमार कामगिरी होत असलेल्या बंगळूरच्या गोलंदाजांनाही निराशेला सामोरे जावे लागले आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीवर १०.४० च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत. सहा सामन्यांमधून त्याने फक्त चारच फलंदाज बाद केले आहेत.

यश दयालने बंगळूरसाठी सर्वाधिक पाच विकेट मिळवल्या आहेत; पण त्याला सामन्याला कलाटणी गोलंदाजी करता आलेली नाही. ग्लेन मॅक्सवेल, रीस टॉप्ली, विजयकुमार वैशाख, कॅमेरुन ग्रीन, मयांक डागर यांनाही अपयशाला सामोरे जावे लागले आहे. एकूणच काय तर बंगळूरला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत कायम राहायचे असल्यास त्यांना सर्व बाबींमध्ये कमालीचा खेळ उंचवावा लागणार आहे.

RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : ड्युप्लेसीच्या सेनेवर पॅट कमिन्स पडणार भारी? जाणून घ्या कशी असेल संघाची प्लेइंग ११
IPL 2024 Points Table : चेन्नईविरुद्ध पराभवानंतर पांड्याला बसला मोठा धक्का! पॉइंट टेबलमध्ये गेली खाली...

क्लासेन, अभिषेक, हेड फॉर्ममध्ये

हैदराबाद संघासाठी हेनरिक क्लासेन (१८६ धावा), अभिषेक शर्मा (१७७ धावा) व ट्रॅव्हिस हेड (१३३ धावा) या तीन फलंदाजांनी कात टाकली आहे. या तीन फलंदाजांनी धावा करण्यासोबतच फलंदाजीचा स्ट्राईक रेटही अव्वल दर्जाचा ठेवला आहे. क्लासेन याने १९३च्या स्ट्राईक रेटने, अभिषेकने २०८च्या स्ट्राईक रेटने व हेडने १७२च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत. बंगळूरच्या गोलंदाजांना या तीन फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे. एडन मार्करम व नितीशकुमार रेड्डी यांनीही आश्‍वासक खेळी केल्या आहेत.

RCB vs SRH Playing 11 IPL 2024 : ड्युप्लेसीच्या सेनेवर पॅट कमिन्स पडणार भारी? जाणून घ्या कशी असेल संघाची प्लेइंग ११
MI vs CSK IPL 2024 : 'स्टंपच्या मागे त्या व्यक्तीने...' मुंबईच्या पराभवानंतर धोनीबद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या?

कमिन्स, नटराजन प्रभावी

हैदराबादने गोलंदाजी विभागात समाधानकारक कामगिरी केली आहे. कर्णधार पॅट कमिन्सने ७.३०च्या सरासरीने धावा देत सहा फलंदाज बाद केले आहेत. टी. नटराजन याने पाच फलंदाज बाद केले आहेत. या दोघांनी संघासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे; पण जयदेव उनाडकट, भुवनेश्‍वरकुमार, नितीशकुमार रेड्डी यांच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे या गोलंदाजांनी दबावाखाली आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com