''वो पुराने दिन'', RCB च्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस | RCB vs SRH Twitter Memes | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RCB vs SRH Twitter Memes

''वो पुराने दिन'', RCB च्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस

IPL 2022: आईपीएलच्या 36 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला 9 गडी राखून पराभूत केला. सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म कमी होण्याचे नाव घेत नाही. त्याचा हा वाईट टप्पा आईपीएलच्या हंगामातही त्याची पाठ सोडत नाही. शनिवारी सलग दुसऱ्या सामन्यात कोहली पहिल्या चेंडूवर बाद झाला. या सामन्यातील आरसीबीची खराब कामगिरी पाहून चाहते सोशल मीडियावर संतापलेले दिसत आहे. (RCB vs SRH Twitter Memes)

हेही वाचा: IPL मध्येच मिळाला भारताचा पुढचा कर्णधार, 'हा' अष्टपैलू लवकरच घेणार हिटमॅनची जागा

फाफ डु प्लेसिसला प्रचंड ट्रोल केले जात आहे. आरसीबीला ट्रोल करत एका चाहत्याने लिहिले, अखेर आरसीबीची जुनी टीम परतली आहे. यासोबतच अनेक मीम्समध्ये आरसीबीची अवस्थाही दिसून येत आहे.

हैदराबादने सलग पाचवा विजय नोंदवला. या विजयासह केन विल्यमसनचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यातही केनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीला केवळ 68 धावांत गुंडाळले.

हेही वाचा: IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video

हैदराबादसाठी, मार्को जॅन्सेन (3/25) याने डावाच्या दुसऱ्याच षटकात RCB - फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि अनुज रावत या तीन मोठ्या विकेट्स बाद करून रॉयल चॅलेंजर्सला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर थांगारासू नटराजन (3/10) याने पाचव्या षटकात धोकादायक ग्लेन मॅक्सवेल (12) याची विकेट घेत आरसीबीला सामन्यातून जवळपास बाहेर काढले. अखेर 16.1 षटकांत संपूर्ण संघ 68 धावांत गारद झाला.

Web Title: Rcb Vs Srh Twitter Memes Reaction Of Fans After Faf Du Plessis Team Virat Kohli Cricket News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top