
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. लखनौमध्ये झालेल्या या सामन्यात हैदराबादने बंगळुरूसमोर २३२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.
हैदराबादसाठी सुरुवातीलाच अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात केली होती, त्यानंतर इशान किशनने शानदार अर्धशतकी खेळी केली. दरम्यान, या सामन्यात अभिषेकच्या एका षटकाराची चांगलीच चर्चा झाली.