प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त; IPL सुरू असतानाच रोहित निवडसमितीला भेटणार

Rohit Sharma Will Meet Selectors
Rohit Sharma Will Meet Selectors esakal

मुंबई : आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) आता शिगेला पोहचला आहे. सध्या प्ले ऑफमध्ये (Play Off) स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ जोर लावत आहे. या सर्व घडामोडी होत असतानाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निवडसमिती सदस्यांना भेटला. या भेटीनंतर लवकरच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (South Africa) मायदेशात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी (T20 Series) संघाची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच टी 20 सामने खेळणार आहे. ही मालिका 9 जून रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना हा फिरोज शाह कोटला स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघातील बरेच खेळाडू सध्या आयपीएल खेळण्यात व्यग्र आहेत.

Rohit Sharma Will Meet Selectors
सीबीआय IPL 2019 च्या बेटिंग प्रकरणातील पाकिस्तान अँगल तपासणार

भारताचा कर्णधार रोहित शर्मा 23 मे ला मुंबईत निवड समिती सदस्यांना भेटण्याची शक्यता आहे. 24 मे ला आयपीएलची पहिली क्वालिफायर मॅच होणार आहे. काही माध्यमांनुसार दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India Announce) घोषणा ही 26 मे ला होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने जेव्हापासून नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली आहे तेव्हापासून भारतीय संघ एकही मालिका हरलेला नाही. यापूर्वी भारतीय संघ ज्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला त्यावेळी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र रोहित त्या संघाचा भाग नव्हता त्याला दुखापत झाली होती.

Rohit Sharma Will Meet Selectors
विराट बाद झाल्यावर पंजाबने केली पोस्ट; चाहते झाले फिदा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना आराम दिला जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला देखील विश्रांती देण्याची चर्चा सुरू आहे. मात्र रोहितचा संघ प्ले ऑफमध्ये पोहचलेला नाही. त्यामुळे रोहितला एक आठवडा अतिरिक्त आराम मिळणार आहे. 4 जूनला भारतीय संघ बेंगलोगमधील नॅशनल क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे. त्यानंतर तो मालिका खेळण्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहे.

भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले

भारतीय टीममधील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे ते आयपीएलमधून देखील बाहेर पडले आहेत. यात फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर दीपक चाहर हा आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला संपूर्ण आयपीएल हंगामाला मुकावे लागले. टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर देखील दुखापतीने ग्रासले आहेत. दुसरीकडे आयपीएलमध्ये युवा खेळाडू गोलंदाजी तसेच फलंदाजीत दमदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे टीम इंडियात नव्या खेळाडूंना जागा मिळण्याची देखील शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com