आर अश्विननं कॅप्टन संजूला तोंडावर पाडलं

Sanju Samson And R Ashwin
Sanju Samson And R Ashwin Sakal

नवी मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात कमालीचा प्लॅन पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना देवदत्त पडिक्कल शून्यावर बाद झाला. पहिली विकेट पडल्यानंतर संजू सॅमसन खेळायला येणं अपेक्षित होते. पण आर अश्विन (R ashwin) क्रिजमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. हे चित्र प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आश्चर्याचा धक्का देणारे होते. मागील सामन्यात अश्विनने चांगली इनिंग खेळली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो आघाडीला खेळला आहे. पण संजू सॅमसनने गुजरात विरुद्ध केलेला हा प्रयोग सर्वांनाच धक्का देणारा होता.

Sanju Samson And R Ashwin
RR vs GT : 4,6,4,4 मिलरची किलर इनिंग; पाहा व्हिडिओ

संजू सॅमसनची ही चाल अपयशी ठरली. आर अश्विन अवघ्या 8 धावांची भर घालून तंबूत परतला. लॉकी फर्ग्युसन याच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने अप्रतिम झेल टिपत. राजस्थानचा आश्चर्यचकित वाटणारा डाव फोल ठरवला. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात अश्विनने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली होती. त्यामुळेच संजू सॅमसन याने कदाचित गुजरात विरुद्धच्या लढतीत अश्विनला प्रमोशन दिले. या निर्णयामुळे आर अश्विन सोशल मीडियावर ट्रेंडही करताना दिसले.

Sanju Samson And R Ashwin
डगमगत्या 'टायटन्स'ला कॅप्टननं सावरलं; पांड्याची नाबाद फिफ्टी

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीला दोन धक्के देत त्याचा निर्णय योग्य असल्याचे संकेतही दिले. पण हार्दिक पांड्याने 52 चेंडूत केलेल्या नाबाद 87 धावा आणि अभिनव मनोहर आणि मिलरची त्याला लाभलेली साथ याच्या जोरावर गुजरातने कमबॅक केले. त्यांनी निर्धारित 20 षटकात 4 बाद 192 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून बटलरने अर्धशतकी खेळी केली. पण त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही. ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्यामुळे राजस्थानच्या हातून सामना निसटत गेला. राजस्थानकडून कुलदीप सेन, युझवेंद्र चहल आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com