
RR vs CSK Live Match Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सने अखेर विजयाची चव चाखली आणि १० व्या क्रमांकावरून संघाची गाडी नवव्या क्रमांकावर आणली. राजस्थानच्या १८२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला १७६ धावा करता आल्या. या सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ( Ruturaj Gaikwad) मुद्याला हात घातला.