कोहलीला 'या' दिग्गजाने दिली जादू की झप्पी; ड्रेसिंग रूमचा व्हिडीओ झाला व्हायरल | Virat Kohli News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Bangar Virat Kohli

डक मुळे खचलेल्या कोहलीला 'या' दिग्गजाने दिली जादू की झप्पी; व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli IPL 2022:आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम चालू आहे. या हंगामात विराट दोन वेळा गोल्डन डकवर आऊट होताना दिसला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. जगदीश सुचिथच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने केन विल्यमसनला कॅच दिला, आणि खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट या हंगामात तिसऱ्यांदा 0 धावांवर बाद झाला आहे. आऊट झाल्यावर तो ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला, तिथे त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. मात्र यावेळी कॅमेरामनने आरसीबी ड्रेसिंग रूममध्ये लक्ष केंद्रित केले तेव्हा आरसीबीचे चाहते खूश झाले.(Sanjay Bangar And Virat Kohli News)

हेही वाचा: अथिया शेट्टीच्या व्हिडिओवर अश्लील कमेंट्स, राहुल भाऊ कुठे अडकलाय...

विराट कोहलीचा ड्रेसिंग रूम मधला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली 0 धावांवर बाद झाल्यानंतर नाराज दिसत होता, परंतु त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर कोहलीजवळ जाऊन त्याला जादूची मिठी देऊन प्रोत्साहन करताना देतात आहे. बांगरने विराटच्या वाईट काळात त्याला ज्या प्रकारे साथ देण्याचा प्रयत्न केला ते पाहून चाहते बांगरचे खूप कौतुक करत आहेत.

कोहलीच्या खराब कामगिरीमुळे आरसीबीचे चाहते त्यांच्यावर निराश झाले आहेत. आयपीएलच्या या शेवटच्या काही सामन्यांमध्ये विराटचा फॉर्म परत यावा अशी त्यांची इच्छा आहे. या वर्षी टी-20 विश्वचषकही खेळला जाणार आहे आणि जर विराट फॉर्ममध्ये परतला नाही, तर टीम इंडियाचा रस्ता कठीण होऊ शकतो.

हेही वाचा: दिल्लीविरुद्ध फलंदाजी करण्यापूर्वी धोनी खातोय बॅट; फोटो व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 192 धावा केल्या. फाफ डू प्लेसिसने नाबाद 73 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिक पाचव्या क्रमांकावर फलंदाजील येत त्याने आठ चेंडूंत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. 193 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने 58 धावा केल्या, परंतु इतर कोणत्याही फलंदाजानी त्याची साथ दिली नाही. आरसीबीने हा सामना 67 धावांनी जिंकला.

Web Title: Sanjay Bangar Comforts Virat Kohli After Third Time Golden Duck Rcb Vs Srh Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLVirat kohliIPL 2022
go to top