MI vs DC : मुंबईचा शेवट गोड; पंत - ठाकूरची चूक RCB च्या पडली पथ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Miss DRS Rishabh Pant Dropped Catch Cost Delhi Capitals

MI vs DC: मुंबईचा शेवट गोड; पंत - ठाकूरची चूक RCB च्या पडली पथ्यावर

मुंबई : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव करत त्यांचे प्ले ऑफमधून पॅक अप केले. मुंबईच्या या विजयामुळे रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (RCB) प्ले ऑफचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मुंबईने दिल्लीचे 160 धावांचे आव्हान 19.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 48 धावा केल्या. त्याला डेवाल्ड ब्रेविसने 37 आणि टीम डेव्हिडने आक्रमक 34 धावा करून साथ दिली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर आणि नॉर्त्जेने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. दरम्यान, ज्यावेळी मुंबई इंडियन्स दिल्लीचे 160 धावांचे आव्हान पार करत होते. त्यावेळी ऋषभ पंतने डेवाल्ड ब्रेविसचा साधा कॅच सोडला. तर शार्दुल ठाकूरने टीम डेव्हिडची एज लागली असताना रिव्हि्यू घेतला नाही. याचा मोठा फटका दिल्लीला बसला. ब्रेविसने 37 तर टीम डेव्हिडने आक्रमक 34 धावा केल्या. (Shardul Thakur Miss DRS Rishabh Pant Dropped Catch Cost Delhi Capitals Mumbai Indians End in winning note)

हेही वाचा: 'दोन कफ सिरप आन द रॉक्स' रवी शास्त्रींची नवी जाहिरातबाजी

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या 160 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला नॉर्त्जेने पहिला धक्का दिला. 13 चेंडू खेळून अवघ्या 2 धावा करण्याऱ्या रोहितला त्याने पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविसने डाव सावरत मुंबईला पंचाहत्तरी पार करून दिली. मात्र अर्धशतकासाठी अवघ्या दोन धावा असताना इशान किशनला (48) कुलदीपने बाद केले.

किशन बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे डेवाल्ड ब्रेविसच्या हाती आली होती. मात्र शार्दुल ठाकूरने त्याचा 37 धावांवर त्रिफळा उडवून देत मुंबईचा सेट झालेला बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये धाडला. त्यानंतर टीम डेव्हिडने तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी रचली. डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावा चोपून आपले काम पूर्ण केले होते. अखेर त्याची ही आक्रमक खेळी शार्दुल ठाकूरने संपवली.

मात्र तोपर्यंत सामना मुंबईच्या पारड्यात आला होता. मुंबईला विजयासाठी 5 धावांची गरज असताना नॉर्त्जेने तिलक वर्माला 21 धावांवर बाद केले. आता सामना 6 चेंडूत 5 धावा असा आला होता. मात्र खलीलने पहिला चेंडू नो बॉल टाकला त्यानंतर रमनदीपने फ्री हिटवर चौकार मारत मुंबईला सामना जिंकून दिला.

हेही वाचा: निखत म्हणते, सलमान इतरांसाठी भाईजान माझ्यासाठी 'जान'

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकून प्रथम दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीला पाचारण केले. मुंबईच्या डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराहने दिल्लीला पॉवर प्लेमध्ये एका मागून एक धक्के दिले. सॅम्सने डेव्हिड वॉर्नरला 5 धावांवर बाद केले. तर जसप्रीत बुमराहने मिशेल मार्शला पहिल्याच चेंडूवर बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉला 24 धावांवर बाद केले.

यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सर्फराज खानसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्कंडेयने सर्फराजला 10 धावांवर बाद करत हा प्रयत्न हाणून पाडला. सर्फराज बाद झाल्यानंतर आक्रमक शैलीचा रोव्हमन पॉवेल पंतला साथ देण्यासाठी आला. ऋषभ पंत आणि रोव्हमन पॉवेल यांनी दिल्लीचा डाव 4 बाद 50 धावांपासून 125 धावांपर्यंत नेला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी रचली.

मात्र रमनदीपने ही जोडी फोडली. त्याने 39 धावांवर खेळणाऱ्या पंतला बाद केले. त्यानंतर रोव्हमन पॉवेलने अक्षर पटेलला साथ देत दिल्लीला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र 43 धावा करून अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या रोव्हमनचा बुमराहने त्रिफळा उडवला. त्यानंतर रमनदीपने शार्दुल ठाकूरला 4 धावांवर बाद केले. अखेर दिल्लीचा डाव 20 षटकात 7 बाद 159 धावांमध्ये संपुष्टात आला.

Web Title: Shardul Thakur Miss Drs Rishabh Pant Dropped Catch Cost Delhi Capitals Mumbai Indians End In Winning Note

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..