
वीस वर्षे माझे रेकॉर्ड कोणी मोडले नाही म्हणत अख्तरने उमरानला दिला खास सल्ला
नवी दिल्ली : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) सध्या जम्मू काश्मीरचा उमरान मलिक (Umran Malik) आव्हान देत आहे. शोएब अख्तरचे सर्वात वेगावान चेंडू टाकण्याचे रेकॉर्ड (Fastest Delivery Record) उमरान मलिक मोडू शकतो अशी चर्चा चाहतेच नाही तर जाणकार देखील करत आहे. दरम्यान, शोएब अख्तरने या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब अख्तर म्हणतो की, जर उमरानने माझे रेकॉर्ड मोडले तर मला सर्वात जास्त आनंद होईल. याचबरोबर शोएबने उमरानला फिटनेसवर भर देण्याचा सल्ला देखील दिला. अख्तर म्हणाला की, 'मला वाटते की त्याची कारकिर्द मोठी असावी. काही वेळापूर्वी माझे कोणीतरी सर्वात वेगवान चेंडू टाकण्याला 20 वर्षे पूर्ण झाले म्हणून अभिनंदन केले. 20 वर्षे झाली माझे हे रेकॉर्ड कोणी माडू शकलेले नाही. कोणालातरी हे रेकॉर्ड मोडावेच लागेल. जर उमरान हे रेकॉर्ड मोडेल तर मला आनंदच होईल. मात्र त्याला दुखापतग्रस्त होण्यापासून वाचले पाहिजे. त्याला कोणतीही दुखापत न होता दीर्घ काळ खेळताना पहाचंय.'
उमरान मलिकने दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात 157 किमी प्रतीतास वेगाने चेंडू टाकला होता. तर रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरूद्ध 161.3 किमी प्रतीतास वेगाने चेंडू टाकला होता. हे रेकॉर्ड अजून तरी कोणाला मोडता आलेले नाही.
शोएब अख्तर पुढे म्हणाला की, 'त्याची अॅक्शन खूप चांगली आहे. मी त्यामध्ये कोणताही बदल करणारस सांगणार नाही. माझ्या मते त्याच्याकडे रॉ पेस आहे हा त्याच्याकडून कोणी घेऊ शकत नाही. इथं गोलंदाज 140 किमी प्रतीतास वेगाने चेंडू टाकण्यासाठी मरत असतात मात्र हा पोरगा सहजच इतक्या वेगाने गोलंदाजी करतोय. त्याला जर मी भेटलो तर मी त्याला जेवढ्या वेगात चेंडू टाकता येईल तेवढ्या वेगात टाक असाच सल्ला देईन.' उमरान मलिकनेने आतापर्यंत आयपीएलमध्ये 13 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. उमरानची तुनला डेल स्टेन, लॉकी फर्ग्युसनशी केली जात आहे. सुनिल गावसकरांसारख्या दिग्गजांनी देखील त्याला जूनमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी केली आहे.