Shubman Gill: गिलला वॉर्नरची बरोबरी करण्याची संधी, फक्त राजस्थानविरुद्ध करावे लागले 'हे' काम

RR vs GT, IPL 2024: राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलला मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे.
Shubman Gill
Shubman GillSakal

Shubman Gill Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 24 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. हा सामना बुधवारी (10 एप्रिल) राजस्थानच्या घरच्या मैदानावर म्हणजेच जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर या सामन्यात गिलने 27 धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये 3000 धावा पूर्ण करेल.

Shubman Gill
Helicopter Shot Video: मुंबई इंडियन्सच्या मैदानात हेलिकॉप्टर शॉट? बापाच्या गोलंदाजीवर लेकाचा धडाकेबाज सिक्स

याबरोबरच तो सर्वात कमी डावात 3000 धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरेल, तसेच डेव्हिड वॉर्नरची बरोबरी करेल. सध्या गिलने आयपीएलमध्ये 96 सामन्यांत 93 डावात 38.12 च्या सरासरीने 29.73 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात 3000 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉर्नर सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 94 डावात 3000 धावा केल्या होत्या. त्याचमुळे गिलने राजस्थानविरुद्धच्याच सामन्यात जर 27 धावा केल्या, तरच तो वॉर्नरची बरोबरी करू शकतो.

Shubman Gill
Virat Kohli: 'क्रिकेटमधला सी पण कळत नाही...', विराटचे बालपणीचे कोच भडकले; स्ट्राईक रेटवर..

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल आहे. गेलने 75 आयपीएल डावातच 3000 धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा केएल राहुल आहे. त्याने 80 डावात 3000 धावना केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात ३००० धावा करणारे क्रिकेटपटू (९ एप्रिल २०२४ पर्यंत)

  • 75 डाव - ख्रिस गेल

  • 80 डाव - केएल राहुल

  • 94 डाव - डेव्हिड वॉर्नर

  • 103 डाव - सुरेश रैना

  • 104 डाव - एबी डिविलियर्स

  • 104 डाव - अजिंक्य रहाणे

राजस्थानला रोखण्याचे गुजरातसमोर आव्हान

हा सामना राजस्थानचा पाचवा सामना आहे, तर गुजरातचा सहावा सामना आहे. राजस्थान या स्पर्धेतील अद्याप अपराजित असलेला एकमेव संघ आहे. राजस्थान संघाने आत्तापर्यंत झालेले चारही सामने जिंकले आहेत, तर गुजरातला पाचपैकी दोन सामने जिंकता आले आहेत, तर तीन सामने पराभूत झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com