CSK vs RCB: ऋतुराजचं नेतृत्व पाहून भारावले गावसकर; म्हणाले, 'सामन्यात त्याने ज्याप्रकारे...'

Ruturaj Gaikwad Captaincy: आयपीएल 2024 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्सचे ज्याप्रकारे नेतृत्व केले, त्याबद्दल गावकरांनी त्याचे कौतुक केले आहे.
Sunil Gavaskar - Ruturaj Gaikwad
Sunil Gavaskar - Ruturaj GaikwadSakal

Ruturaj Gaikwad Captaincy: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेला शुक्रवारी (२२ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडनेही विजयी सुरुवात केली.

आयपीएलच्या या १७ हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी एमएस धोनी चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि यापुढे चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा त्याने २६ वर्षीय ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली. ऋतुराजनेही चेन्नईचे संघाचे पहिल्या सामन्यात चांगले नेतृत्व करत विजय मिळवून दिला.

त्याच्या नेतृत्वाने भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनाही प्रभावित केले. कर्णधार ऋतुराजने गोलंदाजीत केलेल्या बदलांबद्दल गावसकरांनी त्याचे कौतुक केले आहे.

Sunil Gavaskar - Ruturaj Gaikwad
PBKS vs DC : पंतचं पुनरागमन... इम्पॅक्टफुल अभिषेक... खलीलचं धक्कातंत्र मात्र सॅम करन पडला सर्वांवर भारी

सामन्यानंतर गावसकर स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये म्हणाले, 'त्याने गोलंदाजीत खुपच चांगले बदल केले. तो ज्याप्रकारे मुस्तफिजूरचा गोलंदाजीवेळी वापर केला, त्याच्या गोलंदाजीत बदल केला, ते अफलातून होते.'

याशिवाय गावसकरांनी ऋतुराजने सुरुवातीला महागडा ठरलेल्या तुषार देशपांडेवर विश्वास ठेवत शेवटचे षटक देण्याबद्दलही कौतुक केले. त्यांनी या सामन्यात ऋतुराजने दाखवलेल्या निर्णय क्षमतेचेही कौतुक केले.

याबरोबर गावसकरांनी ऋतुराजवर एमएस धोनीचा प्रभाव असल्याचेही म्हटले. ते म्हणाले, 'त्याच्या आजूबाजूला नक्कीच धोनी आहे, जो त्याला मार्गदर्शन करू शकतो, त्याला सांगू शकतो आणि त्याला प्रेरणाही देऊ शकतो. कधीकझी अनुभवी आणि एमएस धोनीसारख्या कुशल व्यक्तीने दिलेला सल्लाही मोठा फरक पाडू शकतो.'

Sunil Gavaskar - Ruturaj Gaikwad
PBKS vs DC, Video: 4,6,4,4,6... दिल्लीच्या अभिषेकचा 'इम्पॅक्ट', हर्षलच्या जखमेवरची काढली खपली, 2021 च्या आठवणी ताज्या

दरम्यान, सामन्यानंतर ऋतुराजनेही त्याच्यावर नेतृत्वाचा फार दबाव नसल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटले की 'मी नेतृत्वाची मजा घेतली. मला याचा फार जास्तीचा दबाव वाटला नाही. मला देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे. त्यामुळे फार ताण आला नाही. नक्कीच माझ्याकडे माही भाई देखील आहे.'

दरम्यान, या सामन्यात चेन्नईसाठी मुस्तफिजूरने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे सामनावीर पुरस्कारही त्याला देण्यात आला. या सामन्यात बेंगळुरूने २० षटकात ६ बाद १७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईने १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग ४ विकेट्स गमावत १९ व्या षटकातच पूर्ण केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com