Sunil Narine KKR vs RR : गंभीर परत आला अन्... आपलं पहिलं IPL शतक ठोकणारा नारायण काय म्हणाला?

Sunil Narine Praise Gautam Gambhir
Sunil Narine Praise Gautam Gambhiresakal

Sunil Narine Praise Gautam Gambhir KKR vs RR IPL 2024 : आयपीएलच्या इतिहासात हॅट्ट्रिक आणि शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये आज सुनिल नारायणने आपले नाव सामील केलं. सुनिल नारायणने राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात आज 56 चेंडूत 109 धावांची शतकी खेळी करत आपलं आयपीएलमधील पहिलं शतक साजरं केलं. गौतम गंभीर पुन्हा केकेआरमध्ये परतल्यानंतर सुनिल नारायण पुन्हा सलामीला खेळू लागला. त्यानंतर यंदाच्या हंगामात तो धुमाकूळ घालतोय.

Sunil Narine Praise Gautam Gambhir
RCB IPL 2024 : निश्चिंत राहा! AI भाऊनं सांगितलंय आरसीबी IPL Title जिंकणार... फक्त 5 वर्ष वाट पाहा

आपल्या पहिल्या वहिल्या शतकी खेळीनंतर सुनिल नारायणने गौतम गंभीरचे तोडंभरून कौतुक केलं. तो म्हणाला की, 'जर हंगामाच्या सुरूवातीला कोणी म्हणालं असतं की तू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असशील असं म्हणालं असतं तर तो एक मोठा जोक असता. मी बऱ्याच काळापासून सलामीला खेळलो नव्हतो. मी गेल्या काही वर्षापासून फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करू शकलो नव्हतो.

मात्र जीजी (गौतम गंभीर) परत आल्यानंतर त्यानं मला सलामीला खेळण्यास प्रवृत्त केलं अन् मला आत्मविश्वास दिला. मला फक्त जाऊन चांगली सुरूवात करून देण्याचं काम देण्यात आलं आहे. कोणतीही परिस्थिती असो मला आक्रमक फलंदाजी करायची आहे. कारण पॉवर प्लेमध्ये डॉट बॉल संघासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जाऊन मी संघाला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न करतोय.

Sunil Narine Praise Gautam Gambhir
MS Dhoni - Suresh Raina: गरजेला मित्राचाच आधार! धोनीला पायऱ्या उतरताना रैनाने दिला मदतीचा हात, Video होतोय तुफान व्हायरल

सामन्याबद्दल बोलताना सुनिल नारायण म्हणाला की, पॉवर प्लेमध्ये आम्हाला त्यांना रोखायला हवं. लवकर विकेट्स घेत सामन्यावर नियंत्रण कायम ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.

(IPL 2024 Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com