
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२६ मे) पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना होत आहे. जयपूरमध्ये होत असलेला हा सामना दोन्ही संघांसाठी क्वालिफायर १ सामन्यात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स समोर १८५ धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव तारणहार ठरला. त्याने या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमालाही मागे टाकले आहे.