
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांना पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यासाठी बंदी असल्याने नियमित कर्णधार हार्दिक पांड्या उपलब्ध नव्हता. त्यामुळे या सामन्यात सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले.