
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेची जोरदार चर्चा आहे. या स्पर्धेत काही संघांची अनपेक्षित कामगिरीही झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे त्यांच्या पुनरागमनाने सर्वांना चकीत केलं.
४ पराभवांनंतर सलग ५ विजय मिळवत त्यांनी पाँइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. मुंबईच्या या यशात सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीचाही मोठा वाटा राहिला.