
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (२८ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होत आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गुजरातने राजस्थानसमोर २१० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
पण या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे. त्याने खणखणीत शतक करताना ३ मोठे विक्रम केले आहे.