IPL मधील खेळाडूंची कामगिरी पाहून BCCI आली टेन्शनमध्ये! T-20 World Cupसाठी 6 विकेटकीपरने ठोकला दावा

T20 World Cup 2024 Team India Squad : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. निवडकर्ते लवकरच वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकतात.
T20 World Cup 2024 Team India Squad
T20 World Cup 2024 Team India Squad News Marathisakal

T20 World Cup 2024 Team India Squad : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा श्री गणेशा 2 जूनला होणार आहे. पण भारतीय संघ पहिला सामना न्यूयॉर्कमध्ये 5 जून रोजी आयर्लंडशी खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. निवडकर्ते लवकरच वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकतात. यासाठी निवडकर्ते 27-28 एप्रिल रोजी बैठक घेऊ शकतात.

मात्र, संघ निवडीपूर्वी यष्टिरक्षकांनी निवड समितीचे टेन्शन वाढवले ​​आहे. 6 यष्टिरक्षक वर्ल्ड कपसाठी दावा ठोकला आहे. यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, इशान किशन आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे. आयपीएल 2024 मधील या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया.

T20 World Cup 2024 Team India Squad
IPL 2024 Points Table : हैदराबादने एका दगडात मारले 3 पक्षी; दिल्लीसह CSK अन् 'या' संघाला बसला मोठा धक्का!

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये त्याने 35 च्या सरासरीने आणि 156.71 च्या स्ट्राईक रेटने 210 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 अर्धशतके झळकावली आहेत. पंत 2024 च्या वर्ल्ड कप स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जातो.

लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधार राहुलने आतापर्यंत 7 सामन्यात 286 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 40.85 आणि स्ट्राइक रेट 143.00 होता. आतापर्यंत राहुलने लीगमध्ये 2 अर्धशतके झळकावली आहेत.

T20 World Cup 2024 Team India Squad
PBKS vs GT IPL 2024 : गतविजेत्या गुजरातसाठी प्लेऑफची वाट बिकट... पंजाबचे शशांक सिंग-आशुतोष शर्मावर पुन्हा एकदा सर्वाच्या नजरा

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने 7 सामन्यात 55.20 च्या सरासरीने आणि 155.05 च्या स्ट्राईक रेटने 276 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. 17व्या सत्रात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 82* धावा आहे.

आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही या मोसमात बॅटने कहर करत आहे. त्याने नुकतीच वर्ल्ड कप खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. त्याने 7 सामन्यांच्या 6 डावात 75.33 च्या सरासरीने आणि 205.45 च्या स्ट्राईक रेटने 226 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत.

मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो MI ला चांगली सुरुवात करत आहे. ईशानने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 192 धावा केल्या आहेत.

जितेश शर्माही वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याने 7 सामन्यात 115 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या 29 धावा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com