BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

Team India T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर लगेचच भारतीय संघाला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यामुळे आयपीएलकडे टीम इंडियाच्या खेळाडूंची तयारी म्हणून पाहिले जात होते.
Team India T20 World Cup 2024
Team India T20 World Cup 2024sakal
Updated on

Team India T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर लगेचच भारतीय संघाला आयसीसी टी-20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यामुळे आयपीएलकडे टीम इंडियाच्या खेळाडूंची तयारी म्हणून पाहिले जात होते. काही खेळाडूंनी येथे चांगली कामगिरी केली पण कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची सलामीची जोडी यशस्वी जैस्वाल यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. या मोसमात दोघांनी नक्कीच शतके झळकावली आहेत पण त्याशिवाय त्यांना कोणताही प्रभाव पाडता आला नाही.

Team India T20 World Cup 2024
Sunil Chhetri : हा माझा अखेरचा सामना असेल... भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने अचानक घेतली निवृत्ती, भावुक Video केला शेअर

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी सलामीचा पहिला पर्याय रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या दोघांनी भारतासाठी सातत्याने डावाची सुरुवात केली. या फॉरमॅटमध्ये ही जोडी हिट ठरली आहे.

आता या दोघांवर टी-20 मध्ये मोठी जबाबदारी असेल. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात, त्यामुळे संघ व्यवस्थापन या जोडीवर विश्वास ठेवेल.

Team India T20 World Cup 2024
Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

मात्र, रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 19 धावा आल्या होत्या, तर त्याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याला फक्त 4 धावा करता आल्या होत्या. रोहित शर्माने या हंगामात आतापर्यंत 13 सामने खेळून 349 धावा केल्या आहेत.

Team India T20 World Cup 2024
SRH vs GT : हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट की गुजरात शेवटच्या लढतीत घालणार विजयाला गवसणी... कोण पडणार कोणावर भारी?

यशस्वी जैस्वाल टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येणार आहे, परंतु त्याचा अलीकडचा फॉर्म चांगला नाही. या हंगामात त्याने केवळ दोन सामन्यांत पन्नासच्या वरचा आकडा गाठला आहे. यातील एक शतकी खेळी आहे जी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळली गेली होती आणि दुसरी हैदराबादविरुद्ध खेळलेली ६७ धावांची खेळी आहे.

याशिवाय त्याने 10, 0, 24, 39, 19, 24, 4 आणि 24 धावांचे डाव खेळले आहेत. रोहितप्रमाणेच यशस्वी जैस्वालने 13 सामने खेळले असून त्याच्या खात्यात 348 धावा जमा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.