VIDEO: शम्सीने बूट काढून आयपीएल फ्रेंचायजींना केला फोन? | Tabraiz Shamsi Boot Celebration | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tabraiz Shamsi Boot Celebration fans says he call IPL Franchise

VIDEO: शम्सीने बूट काढून आयपीएल फ्रेंचायजींना केला फोन?

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीने (Tabraiz Shamsi) दक्षिण आफ्रिका टी 20 चॅलेंज स्पर्धेत दमदार गोलंदाजी केली. त्याने हॅट्ट्रिक (Hat-trick) देखील केली होती. स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये तबरेज टायटन्स संघाकडून खेळत होता. त्याने डॉल्फिनविरूद्ध खेळताना 4 षटकात 15 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर टायटन्स फायनमध्ये पोहचले. मात्र फायनलमध्ये त्यांना रॉक्स संघाकडून पराभव स्विकारावा लागला.

तबरेज शाम्सीने सेमी फायनमध्ये हॅट्ट्रिक करत रूआन डी स्वाईड, ब्राईस पार्सन्स, फेहलुकवायो यांना बाद केले. शाम्सीने वेकेट घेतल्यानंतर आपल्या खास अंदाजात सेलिब्रेशन केले. त्याने आपला बूट काढत तो कानाला लावला आणि टेलिफोन सेलिब्रेशन केले. याबाबतचा व्हिडिओ दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. शाम्सीच्या या सेलिब्रेशनवर अनके चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

एका चाहत्याने तर शाम्सीने हॅट्ट्रिक केल्यानंतर आयपीएल फ्रेंचायजींना (IPL Franchise) कॉल केल्याचे म्हटले. तो कॉल करून फ्रेंचायजींना तुम्ही केवढी मोठी चूक केली आहे असे म्हणाला. तर दुसऱ्या चाहत्याने आयपीएल फ्रेंचायजी विरूद्ध राग व्यक्त केला.

तबरेज शाम्सीने आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL 2022 Auction) आपली बेस प्राईस 1 कोटी ठेवली होती. मात्र लिलावात कोणत्याही फ्रेंचायजीने त्याच्या नावात रस दाखवला नाही. तो अनसोल्ड (Unsold) राहिला. तबरेज शाम्सीने आतापर्यंत 2 कसोटी, 33 वनडे आणि 47 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापूर्वी शाम्सी आयपीएलमध्ये देखील खेळला होता. त्याला फक्त पाच आयपीएल सामने खेळण्याची संधी मिळाली होती. सध्याच्या घडीला शाम्सी टी 20 चा नंबर एकचा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 57 विकेट घेतल्या आहेत.