RR vs DC मॅचमध्ये चाहत्याने टी20 वर्ल्डकपसाठी निवडला संघ; ईशान किशनला दिला डच्चू |Team Iindia Squad for t20 world cup fans reaction during Ipl 2022 dc vs rr match | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team Iindia Squad for t20 world cup
RR vs DC मॅचमध्ये चाहत्याने टी20 वर्ल्डकपसाठी निवडला संघ; ईशान किशनला दिला डच्चू

RR vs DC मॅचमध्ये चाहत्याने टी20 वर्ल्डकपसाठी निवडला संघ; ईशान किशनला दिला डच्चू

आयपीएलच्या महाकुंभात अनेक गोष्टी घडत असतात. प्रत्येक सामन्यात चाहते हटके पोस्टर्स झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अशातच काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स मॅचमध्ये एका चाहत्याने टी 20 वर्ल्डकपसाठी संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे त्याने यंदाच्या आयपीएल मोसमात फ्लॉप ठरलेल्या इशान किशनला डच्चू दिला आहे.

हेही वाचा: 'लिंबू मिरची कुठे आहे' राजस्थान रॉयल्सच्या त्या ट्विटची चर्चा

आयपीएलमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच खेळवण्यात आली. या सामन्यात राजस्थानला दिल्ली कॅपिटल्सकडून 8 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. या मॅचदरम्यान चाहत्यांच्या स्टँडमध्ये झळकावलेले एक पोस्टर चर्चेत आले आहे.

एका चाहत्याने टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या संघाजी निवड केली आहे. यामध्ये त्याने 15 सदस्य निवडले आहेत. या पोस्टरद्वारे त्याने टी 20 साठी टीम इंडियाचा संघ कसा असावा याबद्दल सांगितले आहे. त्याचे हे पोस्टर कॅमेरामध्ये कैद झाले असून सध्या ते चर्चेत आले आहे.

चाहत्याने रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, राहुल तेवतिया, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा. या सर्वांची निवड केली आहे. मात्र. मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.

हेही वाचा: जावईबापु खुश! राहुल -अथियाच्या लग्नावर सासरेबुवा बोलले...

चाहत्याने टी 20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्माच्या हाती संघाची धुरा दिली आहे. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत विकेटकिपरची जबाबदारी सोपावली आहे. कार्तिक सध्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत आहे.

मात्र, या चाहत्याने ईशान किशन आणि रविंद्र जडेजा या दोघांच्या नावाचा उल्लेख संघात केलेला नाही. ही गोष्ट दोन्ही खेळाडूंसाठी निराशजनक आहे. तर फिनिशरच्या रुपात संघात राहुल तेवतिया आणि ऑलरॉऊंडर हार्दिक पांड्याची निवड केली आहे.

Web Title: Team Iindia Squad For T20 World Cup Fans Reaction During Ipl 2022 Dc Vs Rr Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top