बुडत्याचा पाय गाळात; टीम इंडिया पाठोपाठ IPL मधून सुद्धा पत्ता कट ?

खराब फॉर्मचा परिणाम; या दिग्गज भारतीय क्रिकेटरचं करियर संपलं ?
team india batsman ajinkya rahane career over ipl 2022
team india batsman ajinkya rahane career over ipl 2022

IPL 2022: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलचा 15 वा हंगाम सध्या खेळला जात आहे. जगभरातील खेळाडू आपला जलवा या लीगमध्ये दाखवत आहे. आयपीएलने अनेक खेळाडूंचे करिअर घडवले आहे. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असा आहे, ज्याची आयपीएल कारकीर्दही बरबादीच्या उंबरठ्यावर आहे. आपण ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो दुसरा-तिसरा कोणी नसून टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आहे. (Ajinkya Rahane Career Over IPL 2022)

team india batsman ajinkya rahane career over ipl 2022
IPL 2022 : मोहम्मद शमी म्हणजे विल्यमसनचा कर्दनकाळ

आधीच टीम इंडियातून बाहेर पडलेल्या रहाणेला आता त्याची आयपीएल कारकीर्दही संपुष्टात येण्याचा धोका आहे. या मोसमात KKR संघात सामील झालेल्या रहाणेला प्लेइंग 11 मध्ये सुद्धा संधी दिली जात नाही. रहाणेला या हंगामात केकेआरकडून केवळ 5 सामने खेळण्याची संधी दिले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. रहाणेला या हंगामात 5 सामन्यात केवळ 80 धावा करता आल्या. त्यानंतर त्याच्या जागी आरोन फिंचची संघात निवड करण्यात आली. आणि त्यानंतर आता सुनील नरेन आणि सॅम बिलिंग्स यांना संधी देण्यात आली. आता संपूर्ण हंगामात या खेळाडूला पुन्हा संधी मिळणार नाही, असे मानले जात आहे.

अजिंक्य रहाणे आधीच टीम इंडियातून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत निवड समितीने त्याला संधी दिली नाही. कसोटी संघाचे उपकर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहे. आयपीएलमध्ये रहाणे चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करणार असे सगळया वाटत होते, मात्र तो फ्लॉप ठरला झाला आहे. अशा परिस्थितीत त्याचे टीम इंडियात पुनरागमन होण्याची शक्यता कमीच आहे. या खेळाडूची लक्षणीय कारकीर्द आता शेवटच्या वळणावर दिशेने दिसत आहे.

अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये 153 सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 121 च्या स्ट्राइक रेटने 3941 धावा केल्या आहेत. तो पूर्वी मर्यादित षटकांचा उत्तम असा फलंदाज मानला जात होता, परंतु काही कालांतराने तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच राहिला. आता कसोटी संघातूनही बाहेर पडल्यानंतर या खेळाडूच्या कारकिर्दीवर संकट आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com