
उमरान मलिकने शेवटची ओव्हर दात-ओठ खाऊन टाकली अन् रचला इतिहास
सनराईजर्स हैदराबादचा स्पीडस्टार उमरान मलिकने ( Umran Malik) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्धच्या डावातील शेवटचे 20 वे षटक टाकले. या षटकात त्याने तीन चौकार आणि एक षटकारासह 19 धावा दिल्या. मात्र हे षटक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. या षटकात जरी 19 धावा झाल्या असल्या तरी उमरान मलिकने टाकलेले हे यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान षटक म्हणूनही या षटकाकडे पाहिले जात आहे. (Umran Malik Last Over against Delhi Capitals Deliver Fastest Ball on IPL 2022)
हेही वाचा: आयपीएलच्या प्रसारण हक्कासाठी स्काय स्पोर्ट्स, सुपर स्पोर्ट्सही इच्छुक
उमरान मलिकने या षटकातील चौथा चेंडू हा 157 किमी प्रतीतास वेगाने टाकत हंगामातील सर्वात वेगवान चेंडू (Fastest Ball on IPL 2022) टाकला. दिवसेंदिवस त्याच्या गोलंदाजी वेग वाढत असताना आता त्याच्या रडावर शॉन टेटच्या आयपीएलमधील सर्वात वेगावान चेंडू (157.03 किमी प्रती तास ) असणार यात शंका नाही. याच हंगामात उमरान मलिक हा विक्रम मोडून काढले असे दिसते. यापूर्वीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात उमरान मलिकने 154 किमी प्रतीतास वेगाने चेंडू टाकला होता.
हेही वाचा: मुंबईने नवा विकेटकिपर शोधला; टायमल मिल्स आयपीएल मधून बाहेर
उमरान मलिकच्या या वेगावान माऱ्याबाबत सनराईजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) बॉलिंग कोच डेल स्टेन (Steyn) यापूर्वी म्हणाला होता की, 'एखादा गोलंदाज वेगात पळत येऊन 150 किमी प्रतीतास पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकतो हे पाहणे खूप छान वाटते. अनेकवेळा आपण आपल्या वेगात बदल करणारे गोलंदाज पाहतो. उमरान हा एक तगडा गोलंदाज आहे. त्याला त्याच्या परीने गोलंदाजी करण्याची मुभा देणे चांगले आहे. त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे हे खूप भारी आहे. अशा लोकांना फार बदलण्याची किंवा त्याच्यावर निर्बंध घालण्याची इच्छा नाही.' उमरानला आजच्या सामन्यात विकेट घेण्यात यश आले नाही. त्याने 4 षटकात 52 धावा दिल्या.
Web Title: Umran Malik Last Over Against Delhi Capitals Deliver Fastest Ball On Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..