Vaibhav Suryavanshi: "माझं शतक हुकलं कारण..." ९७ धावांची वादळी खेळी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीचा मोठा खुलासा!
Vaibhav Suryavanshi’s Explosive Knock Against SRH: वैभव सूर्यवंशीच्या २९ चेंडूंतील ९७ धावांच्या तुफानी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने ‘क्वालिफायर २’ मध्ये धडक मारली. शतक हुकले तरी संघाच्या विजयाला प्राधान्य दिल्याचे वैभवने स्पष्ट केले.
मुल्लानपूर : वैभव सूर्यवंशी याने २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची खेळी साकारत राजस्थान रॉयल्सच्या सनरायझर्स हैदराबादवरील विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह राजस्थानचा संघ ‘क्वालिफायर टू’ लढतीत पोहोचला.