Vaibhav Suryavanshi Life Struggle Interview: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक कामगिरी करत ३५ चेंडूत शतक झळकावलं. याबरोबरच त्याने युसूफ पठाणचा ३७ चेंडूत शतक ठोकण्याचाही विक्रमही मोडला. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर अशा अनुभवी गोलंदाजांविरूद्धही मोठे शॉट्स खेळले.