
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १० वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जात आहे. हा सामना दिल्लीने घरचे मैदान म्हणून स्वीकारलेल्या विशाखापट्टणममधील सामन्यात खेळवला जात आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादची तगडी फलंदाजी पाहाता त्यांना रोखण्याचे आव्हान यावेळी प्रत्येक संघासमोर असणार आहे. दरम्यान, दिल्लीने मात्र त्यांना सुरुवातीलाच धक्का देण्यात यश मिळवले आहे.