
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी (१६ एप्रिल) झालेला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामना अत्यंत रोमांचक झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
या सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या. यामध्ये रियान परागचा बॅटच्या आकारमानावरून अम्पायरशी वाद झाल्याचेही दिसले.
खरंतर गेल्या काही सामन्यांपासून अम्पायर्सकडून खेळाडूंच्या बॅट वेळोवेळी तपासल्या जात आहेत, ज्यामुळे फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी कोणताही गैरफायदा घेऊ शकणार नाहीत.