
मुंबई इंडियन्सने शनिवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेत गुजरात टायटन्सला एलिमिनेटर सामन्यात २० धावांनी पराभूत केले. मुंबईने या सामन्यात रोमांचक विजय मिळवत क्वालिफायर २ सामन्यात प्रवेश मिळवत आव्हान कायम ठेवले. मात्र गुजरातला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.
गुजरातसाठी हा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना ठरला. या सामन्यात शेवटपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सामन्याचे पारडं कधी गुजरात, तर कधी मुंबईकडे झुकत होतं. पण अखेर मुंबईने विजय मिळवला. तथापि, या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि राहुल तेवातिया यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.