
विराट कोहलीला रनमशीन असं म्हटलं जातं, त्यानेही ते वेळोवेळी सिद्ध केलं आहे. त्याने अनेक विक्रमही त्याच्या नावावर केले. पण तरीही अनेकदा त्याला टी२० क्रिकेटचा खेळाडू म्हणून नावाजले जात नाही.
पण आता त्याने टी२० मध्येच इतिहास घडवला आहे, आजपर्यंत कोणालाही न करता आलेला विक्रम त्याने नावावर केला आहे. त्याने मंगळवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना हा विक्रम केला आहे.