Viral Video : विराट कोहली संतापला; कॅप्टन पाटीदार ऐकत नसल्याची दिनेश कार्तिककडे केली तक्रार

Virat Kohli’s Angry Reaction Sparks Buzz : सामन्यादरम्यान विराट कोहली चांगलाच संतापल्याचं बघायला मिळालं. कोहलीच्या या रागीट प्रतिक्रियेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Virat Kohli Angry Viral Video
Virat Kohli Angry Video Goes Viral esakal
Updated on

Virat Kohli Angry Video Goes Viral: इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून केएल राहुलने नाबाद ९३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान विराट कोहली चांगलाच संतापल्याचं बघायला मिळालं. कोहलीच्या या रागीट प्रतिक्रियेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामुळे आरसीबी संघात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com