

Devdutt Padikkal and Virat Kohli conversation
esakal
Virat Kohli latest viral clip: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा ५७ वा सामना बुधवारी गटविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला गेला. काल झालेल्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करत आपल्या निर्धारित २० षटकांत १९२ धावा केल्या, ज्यात रघुवंशी आणि रिंकू यांनी चांगली कामगिरी केली. धावांचा पाठलाग करायला आलेल्या बंगळुरूने विराट कोहलीच्या शतकाच्या मदतीने हा सामना ६ गडी राखून जिंकला. सामन्यात विराट कोहलीचा देवदत्त पडिक्कलसोबतचा एक संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.