PV Sindhu : पंचांबरोबर वाद; जिंकणारी सिंधू हरली| Yamaguchi Defeat PV Sindhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yamaguchi Defeat PV Sindhu

PV Sindhu : पंचांबरोबर वाद; जिंकणारी सिंधू हरली

मनिला : भारताची ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूचा (PV Sindhu) आशिया चॅम्पियनशिप (Asia Championship) स्पर्धेतील प्रवास कांस्य ( पदकावर येऊन थांबला. जबानच्या अकाने यामागुचीने (Akane Yamaguchi) तीन गेममध्ये पराभव केला. पीव्ही सिंधूने सामन्याची सकारात्मक सुरूवात केली होती. मात्र तिला आपला हा फॉर्म कायम राखता आला नाही. तिचा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या यामागुचीने 21-13, 19-21 आणि 16-21 अशा तीन गेममध्ये पराभव केला. या सामन्यात सिंधूचा पहिल्या गेमनंतर पंचाशी (Referee) वाद झाला होता. त्यानंतर पहिला गेम जिंकणाऱ्या सिंधूने सलग दोन गेम हरले.

हेही वाचा: पहिल्या IPL वेळी कोहली ऐवजी या खेळाडूची केली होती निवड; अजूनही चालूय स्ट्रगल

पीव्ही सिंधूने सामन्याची धडाक्यात सुरूवात करत 16 मिनिटात पहिला गेम 21-13 अशा मोठ्या फरकाने जिंकला. या गेमनंतर सिंधू आरामात सामना जिंकेल असे वाटले होते. मात्र दुसऱ्या गेममध्ये दोन पॉईंट्समध्ये खूप वेळ घेत असल्याने तिच्यावर पाईंट बहाल करण्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी पंचांबरोबर वाद देखील झाला. या लक्ष विचलीत करणाऱ्या घटनेनंतर सिंधू पिछाडीवर पडली. यामागुचीने दुसरा गेम 19-21 असा जिंकत सामना बरोबरीत आणला. लयीत आलेल्या यामागुचीने मागे वळून पाहिले नाही.

हेही वाचा: Virat Kohli | ब्रेबॉर्नवरचा किंग कोहली 2.0; आता शंभर नंतरच 'विश्रांती'

तिसऱ्या गेमच्या सुरूवातीला पी. व्ही. सिंधू पिछाडीवर पडली. शेवटी यामागुचीने पाच मॅच पाईंट जिंकत सामना खिशात टाकला. सिंधू आणि यामागुची यांच्यातील द्वंद्वयुद्धात सिंधू पुढे आहे. सिंधूने आतापर्यंत यामागुचीविरूद्ध 13 सामने जिंकले आहेत तर यामागुचीने 9 सामने जिंकले आहेत.

Web Title: Yamaguchi Defeat Pv Sindhu Argument With The Referee In Asia Championship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top