
Virat Kohli | ब्रेबॉर्नवरचा किंग कोहली 2.0; आता शंभर नंतरच 'विश्रांती'
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामात सुपर फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात टायटन्सचा मुकाबला आज पराभवाच्या गर्तेत अडकेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर बरोबर होता. या सामन्याच्या निकालापेक्षा विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबद्दलच सर्वांना चिंता होती. मात्र ब्रेबॉर्नवर दिसलेल्या किंग कोहली 2.0 ने सर्वांचीच चिंता मिटवली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विराट कोहली बॅक टू बॅक सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने आपला बॅटिंग क्रमांक बदलला. तो सलामीला आला आणि दुसऱ्याच सामन्यात त्याने दमदार अर्धशतक (Half Century) ठोकत आपला बॅडपॅच (Bad Patch) जवळपास संपवला. त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या गुजारात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध धडाकेबाज खेळी केल्याने ही खेळी विशेष आहे. बॅड पॅचमधून जाणाऱ्या विराट कोहलीने आयपीएल साडून विश्रांती घ्यावी अशी मागणी होत होती. मात्र विराटने आपल्या बॅटद्वारे आता शतकाचा दुष्काळ संपवूनच विश्रांती घेणार असल्याचा संकेत दिला.
हेही वाचा: शुभमनची एलॉन मस्कला विनंती, 'स्विगी सुद्धा विकत घ्या' चाहत्यांनी केले ट्रोल
आरसीबीने (RCB) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस शुन्यावर बाद झाल्यामुळे आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी आली होती. विराट कोहलीचा तगड्या संघाविरूद्ध विपरित किंवा आव्हानात्मक परिस्थिती दमदार कामगिरी करण्यात हातखंडा आहे. याही सामन्यात हे दिसून आले. पॉवर प्लेमध्ये विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करत संघाला 43 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, रजत पाटीदार देखील सेट झाला आणि पॉवर प्लेनंतर पाटीदारने आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी विराटने एकेरी आणि दुहेरीवर भर दिली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करत दुसऱ्या विकेटसाठी रजत बरोबर 99 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
हेही वाचा: रोहित शर्माच्या बड्डेच्या दिवशी तरी मुंबईची साडेसाती संपणार का ?
विराट कोहीलने तब्बल 15 आयपीएल डावांनंतर अर्धशतकी खेळी केली. विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच इतक्या दीर्घ काळ अर्धशतक पूर्ण करू शकला नव्हता. विराटचे 2009 ते 2010 या दोन हंगामातील 18 डाव अर्धशतकाविना गेले होते.
Web Title: Virat Kohli Hit Half Century Against Gujarat Titans After 15 Ipl Innings
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..