
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (२४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात ४२ वा सामना होत आहे. बंगळुरूच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात बंगळुरूच्या स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपली आहे. त्याने यासोबतच दोन विश्वविक्रमांनाही गवसणी घातली आहे.
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. बंगळुरूकडून विराट फिल सॉल्ट सोबत सलामीला फलंदाजीला उतरला. त्यांच्यात ६१ धावांची भागीदारीही झाली. सॉल्ट २६ धावांवर बाद झाल्यानंतर विराटने देवदत्त पडिक्कलला साथीला घेतले. त्या दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, दोघांचेही अर्धशतक पूर्ण झाले.