Virender Sehwag David Warner | "खेळण्यापेक्षा त्याचं लक्ष..."; सेहवागने केली डेव्हिड वॉर्नरची चहाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

virender sehwag said david warner

"खेळण्यापेक्षा त्याचं लक्ष..."; सेहवागने केली डेव्हिड वॉर्नरची चहाडी

IPL 2022: डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. डेव्हिड वॉर्नर गेल्या वर्षीपर्यंत सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता, परंतु यावर्षी मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरला ६ कोटी २५ लाखांना विकत घेतले. वॉर्नर दिल्ली फ्रँचायझी संघाकडून खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आयपीएल 2009 मध्येही तो या फ्रँचायझीचा भाग होता, पण तेव्हा संघाचे नाव दिल्ली कॅपिटल्सऐवजी दिल्ली डेअरडेव्हिल्स असे होते. वीरेंद्र सेहवाग दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार होता. टीम इंडिया या माजी क्रिकेटपटूने 13 वर्षांनंतर वॉर्नरबद्दल मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.(Virender Sehwag David Warner)

हेही वाचा: जिंकली मुंबई इंडियन्स; पण हवा मात्र रणवीर सिंगचीच!

सेहवाग क्रिकबझवर म्हणाला की जेव्हा वॉर्नर पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला तेव्हा त्याचे लक्ष खेळापेक्षा पार्टी करण्यावर जास्त होते. पहिल्या वर्षी वॉर्नरचे काही दोन-तीन खेळाडूंशी भांडण झाले होते, त्यामुळे आम्ही त्याला शेवटच्या दोन सामन्यांपूर्वी परत पाठवले होते. त्यावेळी मी माझा राग काही खेळाडूंवर काढला आणि डेव्हिड वॉर्नर त्यापैकी एक होता.

हेही वाचा: पत्नीच्या वाढदिवशी जसप्रीत बुमराह झाला रोमँटिक

सेहवाग पुढे म्हणाला, 'कधीकधी असं होतं की एखाद्याला धडा शिकवण्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन करता. तो संघात नवा खेळाडू होता, त्यामुळे त्याला दाखवून देणं गरजेचं होतं की संघासाठी फक्त तूच महत्त्वाचा नाही, बाकीचेही आहेत. इतर अनेक खेळाडूही आहे जे तुझ्या जागी संघासाठी सामने जिंकू शकतात आणि तसे घडले. आम्ही वॉर्नरला संघाबाहेर ठेवले आणि आम्ही जिंकलो.

Web Title: Virender Sehwag Said David Warner Fought With Players We Sent Back Ipl 2022 Delhi Capitals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top