
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी चेन्नई सुपर किंग्सने चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला ४ विकेट्सने पराभूत केले होते. हा दोन्ही संघांचा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना होता.
दरम्यान, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवलेला असला, तरी मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या २४ वर्षीय फिरकीपटू विग्नेश पुथुरने सर्वांचे लक्ष्य वेधले. त्याने या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना चेन्नईला मधल्या षटकांमध्ये दबावात आणले होते.