IPL 2023: ना विकेट... ना धावा... तरी पण 'या' खेळाडूला मिळाले 14 कोटी रुपये?

बोली इतकी जास्त होती की आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले पण....
IPL 2023 Deepak Chahar
IPL 2023 Deepak Chahar

IPL 2023 Deepak Chahar : आयपीएल 2023च्या लिलावात खेळाडूंच्या बोली गगनाला भिडल्या आहेत. बोली इतकी जास्त होती की आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले, पण या खेळाडूचा लिलावाशी काहीही संबंध नाही. कारण कायम ठेवल्यामुळे तो या हंगामात लिलावात दिसला नाही. दुसरा तिसरा कोणी नसून तो चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आहे.

ज्यांच्यावर चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटी रुपये खर्च केले. पण आधी तो दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर पडला होता. आता आयपीएल 2023 मध्येही त्याची कामगिरी त्याला मिळालेल्या किंमतीच्या जवळपासही नाही.

आयपीएल 2023 च्या सलग दुसऱ्या सामन्यात दीपक चहर विकेट घेण्यात अपयशी ठरला आहे. त्याला अद्याप फलंदाजीत संधी मिळालेली नाही आणि त्याने संघासाठी काहीतरी चांगले करण्याऐवजी त्याने सर्व काही वाया घालवले आहे. दीपक आतापर्यंत त्याचा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.

IPL 2023 Deepak Chahar
IPL 2023: वहिनी काल मॅच जिंकलो म्हणून...सायली संजीवच्या नव्या पोस्टवर नेटकऱ्यांचा सवाल

दीपक चहरने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन सामन्यांमध्ये त्याने 8 षटके टाकली असून त्यात 84 धावा खर्ची केल्या. मात्र विकेटचे खाते अद्याप उघडलेले नाही.

चहर हा आयपीएलच्या खेळपट्टीवर त्याच्या किफायतशीर नेट रन रेटसाठी ओळखला जातो. याशिवाय पॉवरप्लेमध्ये नवीन चेंडूने विकेट घेणे हे त्याचे काम आहे. पण चहर सपशेल अपयशी ठरला आहेत.

IPL 2023 Deepak Chahar
Delhi Capitals vs Gujarat Titans: दिल्ली विजयी लयीत परतणार की गुजरात वर्चस्व गाजवणार? आज राजधानीत रंगणार सामना

आयपीएल 2023 सुरू होण्याआधी दीपक चहर सतत स्पर्धेत आपल्या चांगल्या कामगिरीची बढाई मारत होता. दुखापती टाळत संपूर्ण मोसमात खेळण्याबाबत तो बोलत होता. त्याची विचारसरणी चांगली आहे, पण कामगिरीचे गणित रुळावर आले नाही. दुखापतीमुळे तो बाहेर पडताना दिसत नसला तरी खराब कामगिरीच्या जोरावर कर्णधार धोनी त्याला मैदानाबाहेर नक्कीच बसवू शकतो.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दीपक चहरने 4 षटकात 55 धावा दिल्या. यादरम्यान त्याने विकेट घेतली नाही. त्याचप्रमाणे सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्याने 5 वाइड देखील टाकल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com