IPL 2023 : यशस्वी नाही तर हा खेळाडू होता 'प्लेअर ऑफ द मॅच'चा मोठा दावेदार! कोणीही दिले नाही लक्ष्य

या सामन्यात एक खेळाडू असा होता जो जैस्वालपेक्षा सामनावीराचा अधिक दावेदार होता पण...
Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal
Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahalsakal

IPL 2023 Yashasvi Jaiswal and Yuzvendra Chahal : आयपीएलमध्ये गुरुवारी केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने केकेआरचा 13.1 षटकात 9 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 41 चेंडूत एक गडी गमावून 151 धावा करत सामना जिंकला.

Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal
IPL 2023 : एक छोटीशी चूक पडली महागात! राजस्थानच्या विजयानंतरही या खेळाडूवर BCCIने घेतली ॲक्शन

यादरम्यान यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या 13 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात जैस्वालने 47 चेंडूत 98 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. या सामन्यात एक खेळाडू असा होता जो जैस्वालपेक्षा सामनावीराचा अधिक दावेदार होता. पण त्या खेळाडूवर कोणीही लक्ष्य दिले नाही. या खेळाडूने पहिल्याच डावात राजस्थानचा विजय निश्चित केला होता.

Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal
IPL 2023 Points Table: मोठी उलथापालथ! एका विजयासह RR टॉप-3 मध्ये; KKRच्या पराभवाचा RCBला फायदा

केकेआरविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या विजयामागे यशस्वी जैस्वालचे महत्त्वाचे योगदान होते. पण चहलची कामगिरीही महत्त्वपूर्ण होती. सामन्याच्या पहिल्याच डावात त्याने आपल्या चेंडूने राजस्थान रॉयल्ससाठी शानदार गोलंदाजी केली आणि केकेआरला छोट्या धावसंख्येवर रोखले. त्याने 4 षटकात 25 धावा देत 4 महत्त्वाचे बळी घेतले.

चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांची विकेट घेतली. हे चारही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि केकेआरसाठी सातत्याने धावा करत आहेत. या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्यानंतरही चहलची सामनावीर म्हणून निवड झाली नाही.

Yashasvi Jaiswal Yuzvendra Chahal
IPL : यशस्वी जयस्वालची विक्रमी खेळी

आयपीएल हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. पण युझवेंद्र चहलसारख्या खेळाडूंनी हा मुद्दा चुकीचा सिद्ध केला आहे. चहल सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यासोबतच त्याने केकेआरविरुद्ध शानदार विक्रम केला. या सामन्यात चहलने पहिली विकेट घेताच तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याच्या नावावर आता 143 सामन्यात 187 विकेट्स आहेत. चहलने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने 161 सामन्यात 183 विकेट घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com