युवराज सिंगने बॅड पॅचमधील रोहितबाबत केले मोठे वक्तव्य | Yuvraj Singh Big Statement About Rohit Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yuvraj Singh Big Statement About Rohit Sharma

युवराज सिंगने बॅड पॅचमधील रोहितबाबत केले मोठे वक्तव्य

IPL 2022 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाच वेळा विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी लौकिकास साजेसी झालेली नाही. मुंबई बरोबरच त्याचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) देखील बॅट यंदाच्या हंगामात तळपलेली नाही. गेल्या केकेआर विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा फक्त 3 धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माच्या या बॅड पॅचवर भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh) मोठे वक्तव्य केले.

हेही वाचा: 'छोटी बच्ची हो क्या'; शिखर धवन - प्रिती झिंटाचा जीममधील VIDEO व्हायरल

युवराज सिंहने ट्विट केले की, 'हीटमॅन आतापर्यंत कमनशिबी ठरला आहे. मात्र लवकरच काही मोठं होणार आहे. तुम्ही फक्त चांगल्या मनस्थितीत रहा.' युवराजने रोहित शर्मासाठी केलेल्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. चाहते या ट्विटवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात प्ले ऑफच्या रेसमधून आधीच बाहेर गेले आहेत. तर रोहित शर्माने आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात 200 धावाच करता आल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासातील रोहितची ही सर्वात खराब कामगिरी आहे. मुंबईला अजून 3 सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा: GT vs LSG : राशिद खानसाठी आजचा सामना ठरू शकतो खास

दरम्यान, युवराजने केलेली भविष्यवाणी येत्या 3 सामन्यात खरी ठरते का हे पहावे लागेल. गेल्या सामन्यात केकेआर विरूद्ध रोहित शर्मा 3 धावांवर बाद झाला. मात्र त्याच्या या झेलबाद होण्याबाबत सोशल मीडियावर शंका उपस्थित केली जात आहे. अनेक चाहत्यांना तिसऱ्या अंपायरचा स्निकोमिटरद्वारे दिलेला हा निर्णय चुकीचा वाटतो आहे.

Web Title: Yuvraj Singh Big Statement About Rohit Sharma Bad Patch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top