WI vs IRE : दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विंडीजला आयर्लंडने बसवले घरी

Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier Send Two Time World Champion Home
Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier Send Two Time World Champion Home esakal

Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप पात्रता फेरीत आयर्लंडने दोन वेळच्या वर्ल्डचॅम्पियन वेस्ट इंडीजला पात्रता फेरीतच गारद केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने आयर्लंडसमोर 146 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आयर्लंडने 17.3 षटकात 1 फलंदाजाच्या मोबदल्यातच पार करत विंडीजला तब्बल 9 गडी राखून मात दिली. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक 48 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. तर लॉरकेन टकरने 35 चेंडूत 45 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयर्लंडने सुपर 12 मध्ये प्रवेश केला असून ते ग्रुप 2 मध्ये दाखल झाले आहेत. या ग्रुपमध्ये भारताचा देखील समावेश आहे.

Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier Send Two Time World Champion Home
Virender Sehwag : सेहवागची भविष्यवाणी! वर्ल्डकपमध्ये भारताचा नाही तर पाकचा 'हा' फलंदाज करणार सर्वाधिक धावा

वेस्ट इंंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची पॉवर प्लेमध्येच अवस्था 2 बाद 27 धावा अशी झाली होती. त्यानंतर लुईस आणि ब्रँडन किंगने डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी ग्रेथ डॅनले लुईसला 13 धावांवर बाद करत फोडली. कर्णधार निकोलस पूरन देखील 13 धावांची भर घालून परता. अखेर अर्धशतकी खेळी करणाऱ्या ब्रँडन किंगने विंडीजला शतकी मजल मारून दिली.

मात्र रोव्हमन पॉवल 6 धावा करून बाद झाल्याने विंडीजला स्लॉग ओव्हरमध्ये आपली धावसंख्या वाढवण्यात अपयश आले. ओडेन स्मिथने 12 चेंडूत 19 धावा करत विंडीजला 146 धावांपर्यंत पोहचवले. ब्रँडन किंगने 48 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली. आयर्लंडकडून ग्रेथ डॅनलेने प्रभावी मारा करत 4 षटकात 16 धावा देत 3 फलंदाज टिपले. सिमी सिंग आणि बॅरीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Ireland Defeat West Indies In T20 World Cup 2022 Qualifier Send Two Time World Champion Home
Denmark Open Super 750 : लक्ष्य सेनने भारताच्याच प्रणॉयचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी

वेस्ट इंडीजचे 147 धावांचे आवाक्यातील आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या आयर्लंडने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बालबिर्नेने 7 षटकात 70 धावांचा टप्पा पार केला. यानंतर अकिल हुसैनने अँड्र्यूला 37 धावांवर बाद करत आयर्लंडला पहिला धक्का दिला. मात्र नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या स्टर्लिंगने लॉरकेन टकरसोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 77 धावांची भागीदारी रचत विंडीजचे 146 धावांचे आव्हान 17.1 षटकातच पार केले. स्टर्लिंगने नाबाद 66 तर टकरने नाबाद 45 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com